मुंबई – गेल्या एक महिन्यामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे शेअर कमी दरावर उपलब्ध आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार काल पासून निवडक खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे आजही शेअर बाजारात बरीच खरेदी होऊन निर्देशांक उंचावले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 611 अंकांनी वाढून 56,930 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 184 अंकांनी म्हणजे 1.10 टक्क्यांनी वाढून 16,955 अंकांवर बंद झाला.
मोठ्या कंपन्या पेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी झाल्यामुळे मुख्य निर्देशाकांपेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅप जास्त वाढले, असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
इतर देशांच्या शेअर निर्देशांकतही वाढ हाते असल्याचे वातावरण होते. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढे आल्याचे दिसून आले.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, स्टेट बॅंक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ नोंदली गेली. मात्र विप्रो, आयटीसी, नेस्ले या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
रिऍल्टी, ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन क्षेत्रासह सर्व क्षेत्राचे निर्देशांक आज 4 टक्क्यांपर्यंत वाढले. असे असले तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असल्याचे वातावरण असून काल या गुंतवणूकदारांनी 1,209 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. अशा अवस्थेत देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे समजले जाते.
तेजी- मंदीचा अंदाज
निफ्टीने तांत्रीक दृष्या महत्वाची 16,900 अंकाची पातळी ओलांडली आहे. निफ्टीला आता 16,800 अंकावर चांगला आधार आहे. त्यापेक्षा निफ्टी कमी झाला तर खरेदी करण्यास हरकत नाही असे एलकेपी सिक्युरीटीज या संस्थेचे विश्लेषक रोहीत सिंगरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, निफ्टीला 17,000 अंकांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात निवडक खरेदीसाठी गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. बऱ्याच कंपन्यांचे शेअर सध्या कमी दरावर उपलब्ध आहेत.