Share Market 25 April 2024 : भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 25 एप्रिलला सलग पाचव्या दिवशी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स 486 अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी निफ्टीही वाढला आणि 22,500चा आकडा पार केला. छोट्या आणि मध्यम समभागांमध्येही जोरदार खरेदी दिसून आली. त्यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 2.97 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारादरम्यान, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रियल्टी वगळता, बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. फार्मा, धातू , तेल आणि वायू समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 486.50 अंकांनी किंवा 0.66% ने वाढून 74,339.44 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 167.95 अंकांनी किंवा 0.75% ने वाढून 22,570.35 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.97 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 25 एप्रिल रोजी वाढून 404.34 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 24 एप्रिल रोजी 401.37 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.97 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.97 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 6 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), JSW स्टील, नेस्ले इंडिया आणि NTPC यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 2.30% ते 5.10% वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर सेन्सेक्समधील कोटक महिंद्रा बँकेचे शेअर 10.85 टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), टायटन, बजाज फायनान्स आणि मारुती सुझुकीचे शेअर्स 0.31% ते 1.25% पर्यंत घसरून लाल रंगात बंद झाले.
2,253 समभागांमध्ये वाढ झाली –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज एकूण 3,934 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,079 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,716 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 139 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 249 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 11 समभागांनी त्यांच्या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.