पुणे – पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मिहिका बोले, विहान जोशी, निहिरा कौल, शिवराज पिंगळे या खेळाडूंनी आपापल्या गटात आघाडी कायम ठेवत विजेतेपद पटकावले.
7 वर्षाखालील मुलींच्या गटात पाचव्या फेरीअखेर मिहिका बोले याने अरना बेलानीचा पराभव करून 5 गुण प्राप्त केले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटात निहिरा कौलने आदिती कुलकर्णीचा पराभव करून 6.5 गुण प्राप्त करून विजय मिळवला. या स्पर्धेतील विजेत्या 7 वर्षांखालील मुलींच्या गटात मिहिका बोले, प्रणिता कित्तुर, मुलांच्या गटात विहान जोशी, विभोर गर्ग यांची 11 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथमेश शेरला, विरेश शरणार्थी, मुलींच्या गटात निहिरा कौल, प्रतीती खंडेलवाल यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात शिवराज पिंगळे, दक्षराज बोले, बुमीनाथन ललितादिता, शरणार्थी श्लोक, मुलींच्या गटात धनश्री खैरमोडे, आन्या रॉय, आदिती कायल, शर्वरी उंदळे यांची, तर 19 वर्षांखालील मुलांच्या गटात मनोज जैन, ओम लामकाने, गौरव झगडे, हर्षल पाटील यांची, मुलींच्या गटात सिद्धी पाटील, सिद्धी धाडवे, तन्वी कुलकर्णी, शर्वरी हिर्लेकर यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, महिला ग्रॅंड मास्टर स्वाती घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, इनामदार, आदी उपस्थित होते.