मुंबई – पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतलेल्या जसप्रीत बुमराह याच्या जागी नवोदित वेगवान गोलंदाज महंमद सिराज याची निवड करण्यात आल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. तसेच आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही त्याला संधी देण्यात आली आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. सिराजने टी-20 क्रिकेटमध्ये आजवर सरस कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेतही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
सिराजने 2017 साली न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळले असून त्यात 5 बळी मिळवले आहेत.
सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यात त्याने 10 सामन्यात 13 गडी बाद केले होते. तो नुकताच इंग्लंडवरून काउंटी स्पर्धा खेळून भारतात परतला आहे. तो लगेचच भारतीय संघात दाखल झाला आहे.