पिंपरी -प्रभाग क्रमांक 20, फुलेनगर येथे थेट नळाला लावलेल्या एकूण 19 विद्युत मोटरी महानगरपालिकेच्या वतीने जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई उप-अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह बीट निरीक्षक राजदीप तायडे, मीटर निरीक्षक हटकर यांच्यासह एकूण 30 जणांच्या पथकाने केली.
“ह’ प्रभागाचे उप-अभियंता प्रकाश सगर, चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, दिग्विजय पवार, सन्मान भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.