गांधीनगर – काँग्रेसचे गुजरातेतील युवा नेते हार्दिक पटेल आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच काँग्रेसचा राज्यातील तरुण नेता भाजपच्या गळाला लागल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडताच पक्षाच्या हायकमांडबाबत नाराजी जाहीर केली होती. काँग्रेसमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीचे नुकसान झाले, पक्षाने आपल्याला काम करण्याची संधीच दिली नाही असे आरोप पटेल यांनी लगावले होते.
अशातच आता भाजपमध्ये प्रवेश करीत असलेल्या हार्दिक पटेल यांना त्यांच्या जुन्या ट्विट्सवरून ट्रॉल करण्यात येतंय. काँग्रेसमध्ये असताना पटेल यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. अमित शहा यांना त्यांनी गुंड तर भाजपला वॉशिंग मशीन संबोधलं होत. याच जुन्या ट्विट्सचे स्क्रिनशॉट आता नेटकाऱ्यानी व्हायरल केले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांचे भाजपविरोधातले जुने ट्विट दाखवून ट्रोल केलं आहे.
हार्दिक पटेल यांच्या २९ मार्च २०१७ च्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत एका युजरने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.. या ट्विटमध्ये हार्दिक पटेल यांनी अमित शहा यांना गुंड संबोधलं होत.
Blast from past from #HardikPatel pic.twitter.com/PJXzLVI3fm
— The Third Eye (@_The_Third_Eye) May 31, 2022
भाजपमध्ये केवळ अमित शहा यांची चमचेगिरी करणाऱ्यांना स्थान मिळतं असा आरोपही हार्दिक पटेलांनी केलेला. त्याचाही स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे.
#HardikPatel
Look like Amit Shah got new pair of shoes pic.twitter.com/JuRrlHyeyP— Guddu (@Shubham75183893) May 31, 2022
हार्दिक पटेल यांनी भाजपवर टीका करताना भाजपमध्ये प्रवेश करताच देशद्रोहींना देशभक्ताचा दर्जा दिला जातो असे देखील म्हंटले होते.
BJP is the best washing machine in the world.#HardikPatel pic.twitter.com/FKqus3Jez2
— Aditya Ranjan (@Adityaranjan316) June 2, 2022
हार्दिक पटेल यांचे आजचे ट्विट
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी आज, “राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन.” असं ट्विट केलं आहे.