व्हिएन्ना – ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी दीर्घकाळ संशोधन करून प्रयोगशाळेत कृत्रिम हृदय तयार केले आहे सुमारे दोन सेंटिमीटर आकाराचे हे रुदय पंचवीस दिवस प्रयोगशाळेत टिकटिकत होते मानवी शरीरातील स्टेम सेलचा वापर करून या हृदयाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
या प्रयोगावर गेली बारा वर्षे या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ संशोधन करत होते हा प्रयोग यशस्वी झाल्याने हृदयाशी संबंधित विकारांबाबत काही महत्त्वाची माहिती मिळण्याची खात्री शास्त्रज्ञांना वाटत आहे. ऑस्ट्रिया सायन्स अकॅडमी येथील शास्त्रज्ञांनी ही उपलब्धी साध्य केली आहे.
मातेच्या गर्भाशयात असलेल्या गर्भाचे हृदय कशा प्रकारे काम करते याबाबतचे संशोधन सुरू असतानाच या छोट्या आकाराच्या हृदयाची निर्मिती केली गेली. मातेने मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला जर हृदयविकाराचा त्रास होत असेल तर त्याबाबत काही संशोधन करता येते का याबाबत हा प्रयोग सुरु होता जन्मजात हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या बालकांवर कशा प्रकारे उपचार करता येतील यासाठी हे संशोधन सुरू होते.
अमेरिकेतील मिशीगन विनर युनिव्हर्सिटीतील तज्ञ गोर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शास्त्रज्ञानी आत्तापर्यंत प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम मेंदू यकृत या अवयवांची निर्मिती केली आहे पण कृत्रिम हृदयाची प्रयोगशाळेत निर्मिती करायचा प्रयोग प्रथमच यशस्वी झाला आहे.
ऑस्ट्रियातील शास्त्रज्ञांनी ज्या कृत्रिम हृदयाची निर्मिती केली आहे. ते हृदय सर्वसामान्य हृदया प्रमाणे धडकत ही आहे. त्यामुळे हा प्रयोग महत्त्वाचा मानला जातो. या संशोधनाच्या प्रमुख डॉक्टर साशा मेनजण यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजून एकदा जोपर्यंत हा प्रयोग यशस्वी होत नाही तोपर्यंत हे संशोधन पूर्ण झाले असे म्हणता येत नाही.
भविष्यात अजूनही बरेच संशोधन करणे बाकी असून हृदय बाबतीत वैद्यकीय क्षेत्राला काही महत्त्वाची माहिती उपलब्ध होऊ शकते.