हॉंगकॉंग: भारतीय शटलर सौरभ वर्माने मंगळवारी येथे झालेल्या दोन पात्रता सामन्यांमध्ये सरळ गेम जिंकून हॉंगकॉंग ओपनच्या पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये प्रवेश केला. पात्रता फेरीत चौथ्या मानांकित सौरभने प्रथम थायलंडच्या तानोंगसाक सेन्सॉम्बोन्सुकचा 21-15 21-19 ने पराभव केला तर नंतर फ्रान्सच्या लुकास क्लेरबाऊटवर त्याने अंतिम पात्रता फेरीत 21-19 ने विजय मिळवला.
पुरुष एकेरीच्या मुख्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या अन्य भारतीयांचे सामने उद्या बुधवारपासून सुरू होतील. जागतिक मानांकनात दहाव्या क्रमांकावरील किदांबी श्रीकांत, बी. साई प्रणीत, समीर वर्मा, एच एस प्रणय आणि परुपल्ली कश्यप हे या स्पर्धेतले अन्य भारतीय स्पर्धक आहेत.
श्रीकांतची जपानच्या केंटो मोमोटा आणि सौरभचा भाऊ समीर ताइपेच्या त्सु वेई वानफविरुद्ध लढत होईल. बी साई प्रणीथचीही तिसऱ्या मानांकित चीनच्या शि यू क्यू विरुद्ध सलामीची लढत असेल, तर प्रणय आणि कश्यपची झुंज चीनच्या हुआंग यू झियांग आणि जपानच्या केन्टा निशिमोटोशी होईल.
सात्विक साईराज रणकी रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीचा मिश्र दुहेरीचा सामना होणार आहे. तसेच प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डी यांचा सामना थायलंडची निपीफॉन फुआंगफुआपेट आणि सावित्री अमितरापाई यांच्यात होईल. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या डेचापोल पुआवरानुक्रोह आणि सप्सीरी तरात्तानाचाई यांचा
सामना होईल.