वडगाव मावळ, (वार्ताहर) – होळी व धूलिवंदन सणानिमित्त जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्टतर्फ पारंपरिक शिवकालीन मर्दानी स्पर्धेचे आयोजन केले होते. दगडी गोटी खांद्यावर घेऊन २८५ बैठका मारुन सौरभ नामदेव ढोरे यांनी नवीन विक्रम रचला.
स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वस्ताद उमेश ढोरे यांच्या वतीने त्यांना चांदीची गदा देण्यात आली. तसेच मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने चांदीचे कडे देण्यात आले. तर, अमित मुसळे यांच्या वतीने मोठ्या गोटीवर बैठक मारणाऱ्या खेळाडूला ट्रॉफी देण्यात आली.
वडगाव मावळ येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात शिवप्रतिमेच्या पूजन व मानाची दगडी गोटी पूजन पोटोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे, सुनील चव्हाण, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अमोल भोईरकर, संचालक गणेश विनोदे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंता कुडे, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, वस्ताद उमेश ढोरे आदींच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आमदार सुनील शेळके, बाबुराव वायकर, भास्करराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, अभिनेते प्रतीक मोहीते, अशोक सरपाटील, सुधाकर ढोरे, बापूसाहेब वाघवले, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, विलास दंडेल, राजेंद्र वहीले, रवींद्र काकडे, अर्जुन ढोरे, खंडू भिलारे, अतिश ढोरे दिलीप चव्हाण बाळासाहेब तुमकर आदी उपस्थित होते.
या वेळी स्व. पै. केशवराव ढोरे क्रीडा पुरस्कार देऊन नितीन म्हाळसकर, सौरभ ढोरे व सुरेंद्र भिलारे या खेळाडूंना गौरविण्यात आले. पैलवानांना स्व. पै. केशवराव ढोरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खंडू वाळुंज, भरत लिम्हण, विशाल भोईर, खंडू कालेकर, विकास येनपुरे, संदीप काळे, अमोल राक्षे, नागेश राक्षे, तुषार येवले, प्रतीक देशमुख, अजित करवंदे, विपुल आडकर, सावरी सातकर,
सनम शेख तसेच दगडी गोटीवर सर्वात जास्त बैठका मारणाऱ्या वरिष्ठ गटातील विजेत्यांना अरुण वाघमारे, सुनील दंडेल व अतुल ढोरे यांच्या वतीने तर कुमार गटातील विजेत्यांना विकी म्हाळसकर, अशोक घुले व सागर बरदाडे यांच्या वतीने चषक देण्यात आले.
वरिष्ठ गट सौरभ ढोरे २८५, किशोर धोत्रे २१२, तेजेस भिलारे ६६, नितीन म्हाळसकर ३५, मध्य गोटी, अभिजित दिसले ३५, चिराग वाघवले २६ , मोठी गोटी, कुमार गट विराज वाघवले ११८, हर्ष चव्हाण ८०, यशराज चव्हाण ८०, आर्यन ढोरे ५१, देवेश पाटील ३३, गणेश तुमकर २१, विनित वहीले १८, प्रथमेश नवघने १७, साक्षी म्हाळसकर २८, मयुरी लोळे यांना ७ बैठका मारल्या.