Saudi Arabia: सौदी अरेबियाने हज, उमराह किंवा प्रवासासाठी केएसए व्हिसा नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे सुरू करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म 30 हून अधिक मंत्रालये, प्राधिकरणे आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांशी जोडलेला आहे. सौदीचे हज आणि उमराह मंत्री तौफिग बिन फौजान अल-रबिया यांच्या भारत भेटीच्या काही आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे. या पाऊलामुळे भारतातील हज यात्रेकरूंना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
एका स्थानिक आउटलेटने दावा केला आहे की, यावर्षी 20 लाख भारतीय यात्रेकरू हजसाठी सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता आहे. KSA Visa वापरकर्त्यांना उपलब्ध व्हिसा ओळखण्यात मदत करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान (AI) वापरते. शोध इंजिनमध्ये उपस्थित असलेली केंद्रीकृत प्रणाली वापरकर्त्यांना तपशीलवार मार्गदर्शन प्रदान करते. व्हिसासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि व्हिसासाठी अर्ज कसा करायचा हे देखील या प्लॅटफॉर्मवर सांगितले जाईल. व्हिसा पुन्हा देण्याची सुविधाही असेल. हा नवीन प्लॅटफॉर्म मंगळवारी (19 डिसेंबर) रियाधमधील डिजिटल गव्हर्नमेंट फोरममध्ये लॉन्च करण्यात आला.
पर्यटक वाढवण्याचे उद्दिष्ट –
हे पाऊल 2030 पर्यंत पर्यटकांची संख्या 150 दशलक्षपर्यंत वाढवण्याच्या सौदीच्या योजनेचा एक भाग आहे. सौदी गॅझेटने म्हटले आहे की देशाने 2023 मध्ये 18.6 दशलक्षाहून अधिक व्हिसा जारी केले आहेत.
सौदीच्या मंत्र्याने भारत दौऱ्यावर दिले होते आश्वासन –
विशेष म्हणजे सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक बिन फौजान अल-रबिया नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, त्यांनी भारतीय यात्रेकरूंना होस्ट करण्यासाठी सर्वसमावेशक व्यवस्था सुनिश्चित करण्याबद्दल बोलले होते. भारताच्या भेटीदरम्यान, त्यांनी सांगितले होते की, उमराह व्हिसा 90 दिवसांसाठी वैध आहे आणि व्हिसाधारकांना सौदी अरेबियाच्या कोणत्याही शहरात राहण्याची आणि प्रवास करण्याची परवानगी देतो.