सातारा – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पुणे सातारा रस्त्यावर सातारा शहराच्या अलीकडे लिंब खिंडीच्या जवळ नागेवाडी गावाच्या हद्दीत दोन मार्ग ट्रकच्या अपघाताने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुण्याहून साताऱ्याकडे लोखंडी सळ्या आणि अवजड सामान घेऊन येत असलेल्या माल ट्रकला (एम एच १२ एम एक्स ३२५५) दुसऱ्या माल ट्रकने (एम एच ११ एएल ६४४५) पाठीमागून धडक दिल्याने धडक दिलेल्या हा ट्रक पूर्णपणे अपघात ग्रस्त झाला.
या ट्रक चालक आणि मालक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघही जन बेशुद्ध असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. महामार्गावरील अपघातामुळे सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली होती आणि मदत आणि बचावकार्य सुरू होते.