कराड – दोन वर्षांसाठी तडीपार असूनही, शहरात वावरत असलेल्या आबिद आलम मुजावर (रा. मंगळवार पेठ, कराड) या सराईत गुन्हेगारास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी (दि. 19) रात्री कोल्हापूर नाका येथे अटक केली.
याबाबत माहिती अशी, आबिद मुजावरला सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, आबिद हा कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याला शुक्रवारी रात्री अटक केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.