पुसेगाव – पुसेगाव, ता . खटाव श्री सेवागिरी विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी निबंध व चित्रकला स्पर्धेत उज्वल यश मिळविले .
सातारा जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मोठा गट निबंध स्पर्धेत विद्यालयाची श्रेया सुभाष कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
तर तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षरा पृथ्वीराज चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सावंत ए. बी. सावंत, पर्यवेक्षक एस. डी. सावंत, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.