सातारा – महाराष्ट्राच्या मातीतून अनेक हिरे रत्न निर्माण झालेले आहेत. त्यांनी आपल्या कर्तबगारीवर इतिहास रचला आहे. यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. पुणे जिल्ह्यात किल्ले वाफगाव, ता. खेड येथे साजरा होणाऱ्या महाराज यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार अशी माहिती श्री दिलीप गायकवाड यांनी दिली आहे.
दि. ६ जानेवारी २०२४ रोजी किल्ले वाफगाव येथे साजरा होणाऱ्या महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक सोहळ्या होत आहे. त्याची तयारी सुरू असून सातारा जिल्ह्यातील सर्व होळकरप्रेमी बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असले बाबत श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सातारा येथील कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे. नीरा, ता. पुरंदर या ठिकाणी नुकतीच बैठक झाली असून या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सालाबाद प्रमाणे होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचे पुढाकाराने हा राज्यभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. या वर्षी प्रथमच सन्माननीय होळकर घराण्यातील वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचे प्रयत्नातून शासनाने हा किल्ला सवर्धनासाठी रु.७०० लक्ष अनुदान मंजूर केले आहे . त्या माध्यमातून होळकर घरणाचा इतिहास व शोर्य परंपरा तसेच पुण्यशील अहिल्यादेवी होळकर यांनी गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कारभाराचा इतिहास आपले समोर येणार आहे.
हा राज्यभिषेक सोहळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांढरे, धनगरवाडीचे सरपंच नंदकुमार माने, नवनाथ वलेकर, सरपंच उंबर्डे खटाव , नंदकुमार घुने, राजगे, तानाजी दोलतोडे, शरद दोलतोडे, आण्णा शेंडगे व दिलीप गायकवाड, मल्हारी हुलगे, जगन जानकर, पांडुरंग पिसे, वीरकर, गलांडे, काळे तसेच पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष मालपाणी यांचे ही मोलाचे सहकार्य लाभत आहे.