खा. श्रीनिवास पाटील; पुणे व सोलापूर रेल्वे विभागाची बैठक; जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना केल्या सूचना
कराड – लोणंद येथे रेल्वे मार्गावर ओव्हर ब्रीज बांधण्यासाठी लोकसभेत केलेल्या मागणीनुसार तसा प्रस्ताव रेल्वेने सादर केला आहे. अनेक वर्षांपासून मागणी होत असलेला जुना फलटण हायवेवरील अंडरपासचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. तसेच पाडेगाव, ता. खंडाळा हद्दीत पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर अंडरपास किंवा उड्डाणपूल व्हावा. शिरवडे स्टेशन येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करावे. यासह विविध मागण्या करत खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेच्या समस्या, अडचणी संदर्भात प्रश्न उपस्थित करत सुधारणेबाबत सूचना केल्या.
पुणे येथे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पुणे व सोलापूर विभागाची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, खा. श्रीरंग बारणे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. वंदना चव्हाण, खा. धैर्यशील माने, खा. ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांसह अधिकारी उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, वडगाव हवेली, ता. कराड येथील शेतकऱ्यांनी माझी भेट घेऊन कराड रेल्वे चेनेज नं.213/5 ते चेनेज 213/6 येथे नव्याने बांधण्या त येणाऱ्या अंडरपासची उंची कमी असल्याचे सांगितले. त्याठिकाणी जुना अंडरपास आणि नव्याने बांधण्यापत येणारा अंडरपास याची उंची तपासावी. जुन्या अंडपास एवढी जागा नवीन अंडरपासमध्यो उपलब्ध होण्याची व्यवस्था करावी. अन्यथा, शेतातील ऊस बाहेर काढताना शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होईल.
लोणंद, ता. खंडाळा येथे सईबारई हौसिंग सोसायटी जवळ एल.सी.गेट नं.40 (92/6-7) येथे रेल्वे अंडरपास किंवा रेल्वे ओव्हर ब्रीज बांधा, अशी मागणी लोकसभेमध्ये केली होती. सदर प्रश्न वेळोवळी उपस्थित केला आहे. सध्या याठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रीज व्हावा, यासाठी रेल्वेने पाहणी करून प्रस्ताव सादर केला आहे. सदर पूल भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयाच्या सेतू बंधन योजनेतून महारेल मार्फत करण्यात येणार आहे.
जुन्या फलटण हायवेवर बुटीयानी हॉस्पिटल जवळ चेनेज नं.91/7 लोणंद येथे अंडरपासबाबत तपासणी करण्यॉत आली आहे. रेल्वे अंडरपास व्हावा यासाठी रेल्वेने पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पाडेगाव, ता. खंडाळा हद्दीत पुणे-मिरज रेल्वे महामार्गावर अंडरपास किंवा उड्डाणपूल व्हावा. येथील दोन्ही गेट 24 तास खुले रहावे यासाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग 965 डी या मार्गावर देऊर, ता. कोरेगाव येथे एल.सी.गेट नं.47 वर अंडरपास करण्यावबात नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे सेतू बंधन योजनेतून प्रस्ताव सादर झाला आहे. त्या सर्व कामांच्या कार्यवाहीला गती द्यावी.
शेणोली रेल्वे स्टेशन, ता. कराड येथील रेल्वे ट्रॅक ओलंडण्याहसाठी प्रवाशांसाठी बांधण्योत येणाऱ्या पुलाचे काम लवकर मार्गी लावावे. एल.सी.गेट नं.96 (कोपर्डे गेट) शिरवडे स्टेशन शेजारी लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करावे यासाठी खा.पाटील यांनी सूचना दिल्या. दरम्यान, बैठकीत अधिकाऱ्यांनी नवीन थांबे, विविध स्थानकांवरील लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग, रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग, ओव्हर ब्रिज यांसह ट्रॅक दुहेरीकरण, थांबे, प्लॅटफॉर्म विस्तार, विद्युतीकरण, प्रवाशांसाठी सुविधा, यूटीएस प तिकीट प्रणाली, स्थानकांचे सुशोभीकरण याबाबत माहिती दिली.