सातारा | जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू

आणखी 498 नागरिकांना करोनाचा संसर्ग; करोनाबळी वाढल्याने भीतीचे वातावरण

सातारा (प्रतिनिधी) – राज्यबरोबर सातारा जिल्ह्यातही करोनाचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करत असून, गेल्या 24 तासांमध्ये तब्बल सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर काल (दि. 3) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 498 नागरिक करोना संक्रमित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवालांची संख्या घटली असताना, दुसरीकडे करोनाबळींची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना, मायणी, ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, अंबवडे, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गोंदवले, ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष आणि जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, सैदापूर, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष व पाडळी, ता. सातारा येथील 68 वर्षीय महिला, अशा एकूण सहा कोविडबाधितांचा मृत्यू झाला.

सातारा शहरात सदरबझार 17, मंगळवार पेठ, गोडोली प्रत्येकी चार, शनिवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, शाहूपुरी प्रत्येकी तीन, सदाशिव पेठ, चिमणपुरा पेठ प्रत्येकी दोन, रामाचा गोट, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, प्रतापगंज पेठ, समर्थ मंदिर, बुधवार नाका, करंजे, तामजाईनगर, पिरवाडी प्रत्येकी एक, इतरत्र 41, तालुक्‍यात खेड, संगमनगर प्रत्येकी तीन, रामनगर, कोडोली, सासपडे, पाडळी, नागठाणे, जिहे प्रत्येकी दोन, कृष्णानगर, दत्त कॉलनी, शिवथर, वडुथ, अपशिंगे, मोहितेवाडी, संभाजीनगर, अतीत, अंबवडे, कारी, जैतापूर, सोनवडी, सोनगाव, सैदापूर, एमआयडीसी, दरे खुर्द प्रत्येकी एक, 

कराड शहरात कार्वे नाका चार, मंगळवार पेठ तीन, शनिवार पेठ दोन, सोमवार पेठ एक, इतरत्र 16, तालुक्‍यात मलकापूर 11, आगाशिवनगर, कापिल, हरपळवाडी प्रत्येकी तीन, विंग, वडगाव प्रत्येकी दोन, वारुंजी, कोयना वसाहत, आटके, टेंभू, शेणोली, जानुगडेवाडी, बल्हाणे, कांबीरवाडी, येळगाव, धोंडेवाडी, गोटे, बेलवडे बुद्रुक, कोपर्डे, कोर्टी, कार्वे, करवडी प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यात पाटण सात, रामापूर, माजगाव, तारळे, ठोमसे, मुरुड प्रत्येकी एक, 

फलटण शहरात रविवार पेठ पाच, लक्ष्मीनगर चार, विवेकानंदनगर तीन, कसबा पेठ, मलठण प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, विद्यानगर प्रत्येकी एक, इतरत्र 17, तालुक्‍यात कोळकी, चव्हाणवाडी प्रत्येकी पाच, पिंप्रद, सासवड प्रत्येकी चार, हिंगणगाव, तरडगाव प्रत्येकी तीन, वाखरी, विडणी प्रत्येकी दोन, साखरवाडी, गिरवी, खुंटे, आंदरुड, जिंती, सस्तेवाडी, फरांदवाडी, सुरवडी, खडकी, गुणवरे, जाधववाडी, कर्णे वस्ती, मतेकरवाडी, चौधरवाडी, वेलोशी, कोडाळकरवाडी, मिरगाव, सुरवडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात चितळी 11, मायणी चार, डिस्कळ, एनकूळ, पुसेगाव, वडूज, नेर प्रत्येकी दोन, खटाव, तडवळे, कटगुण, कारंडवाडी प्रत्येकी एक, 

माण तालुक्‍यात म्हसवड चार, वाकी वरकुटे तीन, दहिवडी दोन, राजेवाडी, वावरहिरे, गोंदवले, राणंद, पानवण, दिवड, काळचौंडी, दीडवाघवाडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात कोरेगाव आठ, देऊर तीन, रहिमतपूर, एकंबे, घाडगेवाडी प्रत्येकी दोन, नलवडेवाडी, पळशी, वाघोली, आर्वी, आझादपूर, बर्गेवाडी, वाठार, किन्हई प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ 13, शेखमिरवाडी पाच, खंडाळा, विंग प्रत्येकी चार, लोणंद, सुखेड, शिंदेवाडी, सांगवी प्रत्येकी दोन, भादे, नायगाव, बावडा, कर्णवडी, वाठार, गुठळे, पारगाव, तोंडल प्रत्येकी एक, वाई शहरात गणपती आळी, रविवार पेठ प्रत्येकी चार, दत्तनगर तीन, रविवार पेठ, धर्मपुरी प्रत्येकी दोन, जेऊरकर कॉलनी, सिद्धनाथवाडी प्रत्येकी एक, इतरत्र एक, 

तालुक्‍यात अभेपुरी तीन, सुरुर, पसरणी प्रत्येकी दोन, जांब, बोपेगाव, ओझर्डे, भुईंज, बोरगाव प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात महाबळेश्वर 13, पाचगणी सहा, भेकवली, रांजणवाडी, भिलार, भोसे प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात वालुथ आठ, पानस सहा, घोटेघर चार, हुमगाव दोन, कुडाळ, काटवली प्रत्येकी एक, इतर नऊ, इतर जिल्ह्यातील कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, रायगड प्रत्येकी दोन, मुंबई, सोलापूर प्रत्येकी एक, असे 498 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.