माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णी यांचे निधन

मुंबई – आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णी यांचे आज निधन झाले. त्यांचे वयवर्षे 68 होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा मुत्यू झाला.

सुहास कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी करोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने कौशल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर सुहास कुलकर्णी यांनी प्रशिक्षण देण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांडूना मार्गदर्शन केले आहे.

इंदौर येथे 2019मध्ये झालेल्या नॅशनल मॉस्टर्स स्पर्धेचे अजिंक्‍यपद त्यांनी पटकाविले होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेक दिग्गज खेळाडूंनी शोक व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.