वाई – शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी वाई व मांढरदेवचे दर्शन घेऊन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांचा सातारा दाैरा संपन्न झाला. त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथे शिवसेना वैद्यकीय मदत केंद्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे भेट दिल्यानंतर वाईमध्ये येऊन त्यांनी वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. तदनंतर त्यांनी मांढरदेवी येथे जाऊन मांढरदेवीचे दर्शन घेतल्यानंतर वाईमध्ये महागणपतीचे आरती झाली. यावेळी वाई विधानसभा प्रमुख विकास आण्णा शिंदे व शिवसेना वाई तालुका प्रमुख रविंद्र भिलारे यांनी अक्षयमहाराज भाेसले यांचा सत्कार केला.
यावेळी शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, महाबळेश्वर तालुकाप्रमुख संजय शेलार, महाबळेश्वर शहर प्रमुख विजय नायडू, युवा सेना जिल्हा संघटक संजय ओंबळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख विशाल संकपाळ, महिला उपजिल्हा संघटिका वनिता जाधव, वाई तालुका प्रमुख रविद्र आप्पा भिलारे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रणव थोरवे, तुकाराम तुपे प्रतिक जगताप, शुभम पिसाळ, संजय पिसाळ, विकास जाधव, धनंजय चव्हाण, अक्षय चव्हाण, शैलेश दिवार, दत्ता कोंढाळकर, दत्ता पोळ, सचिन वायदंडे तसेच शिवसवनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.