सातारा – जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 92.33 अब्ज घन फूट पाणीसाठा असल्याचे कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अब्ज घनफूटमध्ये झालेला पाणीसाठा (कंसात धरणसाठ्याची टक्केवारी) पुढीलप्रमाणे- मोठे प्रकल्प – कोयना – 61.64 (61.56), धोम – 7.65 (65.44), धोम – बलकवडी – 3.41 (86.11), कण्हेर – 5.54 (57.77), उरमोडी -5.16 (53.47), तारळी – 5.00 (85.62).
मध्यम प्रकल्प – येरळवाडी -0.01 (1.45), नेर – 0.08 (19.47), राणंद – 0.01 (4.42), आंधळी – 0.02 (8.02), नागेवाडी – 0.06 (28.57), मोरणा – 0.88 (67.54), उत्तरमांड – 0.45 (52.21), महू – 0.88 (80.64), हातगेघर – 0.11 (44.92), वांग (मराठवाडी) – 1.43 (52.57) या प्रमाणे पाणीसाठा आहे. जिल्ह्यात सरासरी 11.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एक जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 373.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हा पाऊस एकूण सरासरीच्या 42.1 टक्के इतका आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.) पुढीलप्रमाणे आहे. सातारा – 11.1 (384.7), जावली-मेढा – 16.9 (684.0), पाटण -23.2 (711.2), कराड -13.4 (210.4), कोरेगाव – 5.8 (171.7), खटाव – वडूज – 6.7 ( 136.2), माण – दहिवडी -2.4 (117.8), फलटण – 3.2 (86.0), खंडाळा -4.1 (123.7), वाई -9.5 (288.2), महाबळेश्वर -41.4 (1950.1)