सातारा – जिल्ह्यात सोमवारी (दि. 8) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 66 नागरिकांना करोना संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. गेल्या 24 तासांमध्ये एकही करोनाबळी नसल्याने आणि रविवारच्या तुलनेत बाधितांची संख्या तिपटीने कमी झाल्यामुळे जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात सदरबझार तीन, तामजाईनगर दोन, मंगळवार पेठ, चिमणपुरा पेठ, भवानी पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, करंजे, विलासपूर प्रत्येकी एक, इतरत्र तीन, संगमनगर, म्हसवे, पिलाणीवाडी, मुळीकवाडी प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात शनिवार पेठ तीन, सोमवार पेठ एक, इतरत्र दोन, हिंगोळे, अणे प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण एक, फलटण तालुक्यात कोळकी दोन, फलटण, आसू, शिंदेवाडी, मुंजवडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात पुसेगाव दोन, माण तालुक्यात पळशी, शिंगणापूर प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव चार, जळगाव दोन, धामणेर, पिंपरी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात पिंपरे खुर्द दोन, लोणंद एक, वाई तालुक्यात पाचवड एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी दोन, जावळी तालुक्यात केळघर दोन, इतर नऊ, बाहेरील जिल्ह्यातील पुणे (लोणावळा) दोन, असे 66 नागरिक बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 59 हजार 979 झाली आहे.