कोरेगाव – तडवळे, ता. कोरेगाव येथील श्रीसिद्धेश्वर हायस्कूल माजी शिक्षक, एस. एस. सी. १९८७ बॅचचे माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी गुरु-शिष्य दिनदर्शिका २०२४ नावाचे कॅलेंडर काढून गुरु शिष्य परंपरेचा एक आदर्श निर्माण केला. या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात तडवळे येथे झाला.
प्रसिद्ध उद्योगपती व तडवळे गावचे सुपुत्र सदाशिव बोराटे यांच्या हस्ते व नाट्य लेखक व कादंबरीकार जगन्नाथ शिंदे व चित्रकार,पत्रकार, नाट्यकलाकार धनराज जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीमती मालती पवार, अरुण माने, व्ही. एन. जाधव, इनामदार,
जी. ए. गायकवाड, बी. के. जाधव, आर. एम. जाधव, टी. एस. शिंदे, माने व सर्व माजी शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. माजी विद्यार्थी निवास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी शशिकांत कळंबे यांनी आभार मानले.