फलटण, (प्रतिनिधी) – पुणे-पंढरपूर महामार्गावर राजुरी, ता. फलटण गावच्या हद्दीत एसटी बसने (एमएच-14-बीटी-3359) बैलगाडीला सोमवारी (दि. 5) रात्री 8 च्या सुमारास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गाडीवान सोनू अभिमन्यू सोनवणे (वय 31, रा. बोधवड, ता. भुसावळ, जि. जळगाव) आणि बैल ठार झाला.
याप्रकरणी मंगळवेढा एसटी आगारातील बसचालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे (रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत