सातारा – नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे माण-खटाव मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खटाव तालुका हद्द ते मांडवे वस्ती रस्ता सुधारणा (दोन कोटी), चितळी रा. मा. 143 ते इजिमा 96 रस्ता सुधारणा, गोरेगाव-मोराळे रस्ता सुधारणा, बोंबाळे-डांभेवाडी रस्ता सुधारणा, ग्रामा 216 ते कुरोली यशवंतबाबा आश्रम रस्ता सुधारणा, निमसोड-शेनवडी रस्ता सुधारणा, वडूज-तडवळे, रा.मा. 124 गोपूज ओढा-शिरसवडी, सिद्धेश्वर कुरोली-धकटवाडी, चितळी-संध्यामठ, जायगाव-भोसरे, धांडेवाडी-म्हसवड, पाचवड-विखळे, त्रिमली-नांदोशी, तडवळे-गोसावीबुवा, जायगाव-वेळू, लांडेवाडी-वाघजाई, प्रजिमा 38 ते पिंगळवाडी-गणेशवाडी, आंबे मळा ते गुरसाळे, औंध-गोसाव्याचीवाडी-कुमठे ग्रा.मा. 217, भाग औंध-कुंभार टेक-आयटीआय, औंध गावओढा-नवर वस्तीमार्गे सूर्यवंशी वस्ती, कातरखटाव-येरळवाडी(प्रत्येकी 30 लक्ष),
गारुडी-पावणे वस्ती, मोराळे-शिंदे वस्ती, अंबवडे-गव्हाळ मळा, रा.मा.146 ते रान मळा कातरखटाव, कातरखटाव ते बोडके मळा-डाळमोडी, प्रजिमा 44 ते ढोकळवाडी, कानकात्रे-ढोकळवाडी, कारन्हरवाडी येथील दरा रस्ता, वडी-आर्वी, गारुडी-विभूतवाडी, गारळेवाडी ग्रा.मा., नागाचे कुमठे-सिद्धेश्वर कुरोली, वडूज-डाळमोडी-बोंबाळे, बोंबाळे-नवलेवाडी वस्ती, सूर्याचीवाडी-रा.मा. 60, प्रजिमा 10 ते औंध जोतिबा मंदिर, अंबवडे जुना पिंपरी जोडरस्ता, एनकुळ-पळसगाव, नायकाचीवाडी-वडूज, विखळे-भिकवडी, चितळी-माहुली (प्रत्येकी 25 लक्ष), पळशी-चौगुले मळा, पळशी-वरचा मळा, पडळ-माळवे वस्ती (प्रत्येकी 10 लक्ष), पूर्व घाडगे वस्ती ते निमसोड (20 लक्ष), नांदोशी खबालवाडी (28 लक्ष), लोणी-वाघ वस्ती (27 लक्ष), पाचवड-कटरेवाडी (35 लक्ष), चितळी गावाजवळ येरळा नदीवरील पूल (साडेदहा कोटी), असा निधी मंजूर झाला आहे.
माण तालुक्यातील दानवलेवाडी-हस्तनपूर, मार्डी-पळशी, शिखर शिंगणापूर देऊळ, मोही-मुसलमान वस्ती, समर्थ मंदिर-ओढा, बोडके-बोराटवाडी-टाकेवाडी, रांजणी-माळवाडी-वरकुटे, मसाई-बोनेवाडी-नागोबा मळा, हवलदारवाडी-रा.मा 145, बिदाल जोडरस्ता, रांजणी-चिंचणे मळा, येळेवाडी-मोरदरा, गोंदवले बुद्रुक-शेवरी पूल, बोडके-शिंदी बुद्रुक, पुळकोटी-शिरताव, पिंपरी गावठाण रस्ता सुधारणा, रा.मा. 60-गोसावीवाडी, कोळेवाडी-दोरगेवाडी, वरकुटे-मलवडी-कुरणेवाडी, प्रजिमा 10-श्रीपालवण-गाडेवाडी-शिंदी, देवापूर-शिरताव-जांभुळणी-वळई, खुटबाव-भालवडी-रांजणी, विरळी-काळचौंडी-वरकुटे मलवडी, लांडेवाडी-कापूसवाडी, उकिर्डे-शेरेवाडी-दिवडी (प्रत्येकी 30 लक्ष), रा.मा. 60-पाचवड, दिवड-दरुज, पांढरवाडी-कोळेवाडी, दहिवडी-कोकरेवाडी-शेरेवाडी, पवारवाडी-वाडीखोरा-सोकासन, जाशी-पवारवाडी,
तुपेवाडी-वरकुटे म्हसवड-पाटाळे-खडकी, रा.मा. 145-म्हसकरवाडी रस्ता, कुकुडवाड-पुकळेवाडी, कारेवाडी-जमालवाडी-बागलवाडी, गंगोती-जांभुळणी, वरकुटे-म्हसवड-लोणार-खडकी-शंभूखेड, वडगाव-दडस वाडा, वडगाव-महादेवदरा, मोगराळे-सत्रेवाडी-डांगेवाडी, टाकेवाडी-सतोबा मंदिर, प्रजिमा 49-पवारवाडी-माटेवाडी, लोणार-खडकी-महादेव मंदिर, आगासवाडी-कणसेवाडी, रामोशी वस्ती-वरकुटे मलवडी (प्रत्येकी 25 लक्ष), बल्लाळवाडी-कोकरेवाडी, महिमानगड-जगताप वाडा, चिल्लारवाडी-विरळी, कासारवाडी-कोळेवाडी, ग्रा.मा. 82-लोणारबाबा मंदिर (बिदाल), दहिवडी-भवानवाडी-जाशी, प्रजिमा 48-अनभुलेवाडी-किसवे वस्ती, प्रजिमा 13-जांभुळणी, पळशी-वाकी-वरकुटे म्हसवड, मार्डी-घाडगे वस्ती, गोंदवले खुर्द-प्रजिमा 50, धनवडेवाडी-रा.मा. 145, मोगराळे-शिंदे वस्ती, बोडके-शिंदी बुद्रुक, प्रजिमा 49-खुटबाव, हिंगणी-खांडेकर वस्ती, रा.मा.141-दिवड-नागोबा देऊळ-गंगोती,
रा.मा. 141-काकडे गोठा-स्वरुपखानवाडी, घोडेवाडी-साबळे तळे, मार्डी (वाडीखोरा)-नारनवर वस्ती-काळे वस्ती (प्रत्येकी 20 लक्ष), शिंदी बुद्रुक-पिंगळी बुद्रुक, शेनवडी-काळचौंडी, मेगा सिटी-वीरकरवाडी, धामणी-ढाकणी, भाटकी-रा.मा.145 रस्ता, रा.मा. 149-वाघमोडेवाडी-किरकसाल, रा.मा. 145-नागोबा मंदिर (प्रत्येकी 40 लक्ष), थदाळे-डंगीरेवाडी, पुळकोटी-इ.जि.मा 109, उगळ्याचीवाडी-वारुगड-ग्रा.मा. 45, खडकी-भटकी रस्ता सुधारणा (प्रत्येकी 15 लक्ष), काळेवाडी-दोरगेवाडी, शेवरी-कोकरेवाडी (प्रत्येकी 10 लक्ष), दीडवाघवाडीजवळ निगम सेतू, बोडके-बोराटवाडी-टाकेवाडी, रा.मा.139-शेडदरा (आंधळी), गोविंद स्टोन क्रेशर-शेवरी,
दिवड-धामणी, वडगाव-कोकरेवाडी, प्रजिमा 10-नवलेवाडी, शिंदी खुर्द-गायदरा-खंड्याचीवाडी-वारुगड (प्रत्येकी 50 लक्ष), बिदाल-बोडके, प्रजिमा 49-पावकता मंदिर (प्रत्येकी 35 लक्ष), पळशी-मोडका महादेव मंदिर (60 लक्ष), बिदाल-महादेव मळा (28 लक्ष), भांडवलीजवळ पूल, मोही-इंजबाव सुधारणा, गटेवाडी फाटा-वडजल रस्ता (प्रत्येकी अडीच कोटी), म्हसवड-भाटकी फाटा (दोन कोटी), गोंदवले-काळेवाडी फाटा (सव्वादोन कोटी), घोडेवाडी, मलवडी-सत्रेवाडी रस्ता रुंदीकरण, भौमितिक सुधारणा (प्रत्येकी एक कोटी), गणेश मंदिर-खोकडे (27 लक्ष) असा निधी मंजूर करण्यात आला आहे.