कराड -प्रेमसंबंधातून पळून जाण्यास मदत केल्याच्या कारणावरून कराड तालुक्यातील एका गावात मुलीच्या नातेवाइकांनी मुलाचा भाऊ आणि आईवडिलांसह मदत करणाऱ्या एकास लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सोमवार, दि. 30 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सपोनि शितोळे तपास करत आहेत.