सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयातील करोनाग्रस्ताच्या १४ व १५ दिवसांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण करोनामुक्त झाला असून त्याला टाळ्यांच्या कडकडाटात शुभेच्छा देत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मुंबईवरून आल्यानंतर पॉझिटिव्ह निघालेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचे १४ आणि १५ दिवसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आता तो करोनामुक्त झाला आहे. या व्यक्तीला येथील.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज रविवारी घरी सोडण्यात आले. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.