मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण; सामाजिक क्षेत्रातील कार्याचा सन्मान
कराड – येथील “दक्ष कराडकर’ ग्रुपला रोटरी क्लब ऑफ कराडचा कराड रोटरी अवॉर्ड 2023/24 सामाजिक पुरस्कार आदरणीय यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथील दिमाखदार सोहळ्यात शनिवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ग्रुपचे ऍडमिन प्रमोद पाटील (बापू) यांच्यासह सदस्यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.
कराड शहरासाठी सदैव दक्ष राहून सामान्य नागरिकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यात दक्ष कराडकर ग्रुपने नेहमीच पुढाकार घेतला. अगदी सुरुवातीपासून ग्रुपच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध अडचणी सोडवण्यासाठी या ग्रुपच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. ग्रुपच्या डमिनसह सदस्य यांनी वेळोवेळी शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला.
कराड शहरासाठी दक्ष कराडकर ग्रुप हा दक्ष होऊन सर्वच घडामोडीवर लक्ष ठेवून असतो. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक यासह शहरात रोज उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करणारा ग्रुप म्हणजे दक्ष कराडकर ग्रूप आहे. शहरातील नागरिकांनी या ग्रुपवर विश्वास ठेवून या ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपायोजनांना नेहमी सहकार्य केले. म्हणूनच ग्रुपचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कराड शहरातील दक्ष कराडकर हा ग्रुप 2017 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कराड व कराड परिसरातील समस्या, अडचणी, नागरिकांच्या मदतीसाठी सेवा देत आहे. कोरोना काळातील या ग्रुपने उल्लेखनीय कार्य केले आहे.
या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ कराडने दक्ष कराडकर ग्रुपला सामाजिक संस्था विभागातून कराड रोटरी अवॉर्ड 2023-24 देवून सन्मानित केले आहे. हा अवॉर्ड इंटरनॅशनल बिझनेस कोच दिलीप आवटी यांचे हस्ते देण्यात आला.
कराडकर नागरिकांच्या पाठबळावर “दक्ष कराडकर’ ग्रुपला मिळालेल्या या पुरस्कारामध्ये सर्व सदस्यांचे सामूहिक योगदान आहे. हा पुरस्कार दक्ष कराडकर ग्रुपला आणखीन प्रेरणा व उत्साहात देणारा ठरेल.
– प्रमोद पाटील ग्रुप ऍडमिन, दक्ष कराडकर ग्रुप, कराड)