सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून सोमवारी ४० रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०० झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे ५, सह्याद्री हॉस्पिटल येथील ५, कोविड सेंटर रायगांव येथील २ व खावली येथील ४, पार्ले ता. कराड येथील करोना केअर सेंटर येथील ५ असे एकूण २१ करोनाबाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून सोमवारी १९ जणांना घरी सोडण्यात आले होते
. त्यामुळे दिवसभरात एकूण ४० करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या २०० झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.