शिराळा – ऐतवडे खुर्द, ता. वाळवा गावच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून आणला आहे. गावात आत्तापर्यंत कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत. यापुढेही विविध योजनांच्या माध्यमातून आणखी विकासनिधी आणणार असून ऐतवडे खुर्दच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.
ऐतवडे खुर्द येथे एक कोटी 30 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील होते.
या विकासकामांमध्ये हरिजन वसाहत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 45 लाख, हिंदु स्मशानभूमी सुधारणा, निवारा शेड बांधणे 30 लाख, पशुवैद्याकिय दवाखाना नूतनीकरण 20 लाख, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण 20 लाख, नळपाणी पुरवठा योजना जागेस संरक्षक भिंत 15 लाख रुपये या कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, इस्लामपूर बाजार समितीचे माजी उपसभापती सी. व्ही. पाटील, सरंपच संभाजी पाटील, उपसरंपच मनीषा पाटील, माजी सरपंच ज्योत्स्ना पाटील, दिनकर पवार, विजय पाटील, रुपाली पाटील, माणिक माळी, तानाजी गायकवाड, प्रकाश बर्गे, स्नेहल पाटील, सरिता रणभिसे, वैशाली सपकाळ, सुप्रिया चांदणे आदी. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.