वाई – भाजप वाई शहर कार्यकारिणी, विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांनी केली आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि माजी आमदार मदन भोसले यांच्याशी चर्चा करून आणि शहराचा भौगोलिक, सामाजिक व राजकीय अभ्यास करून, कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे, असे ढेकाणे यांनी सांगितले.
सरचिटणीसपदी प्रशांत नागपूरकर, उपाध्यक्षपदी सचिन जमदाडे, अमित वनारसे, डॉ. मकरंद पोरे, प्रसाद शेवडे, संदीप जोशी. चिटणीसपदी स्नेहा थिटे, सारिका गवते व सुहास देशपांडे, कोषाध्यक्षपदी सुनील साठे, महिला मोर्चा अध्यक्षपदी अपर्णा वाईकर, युवा मोर्चा अध्यक्षपदी सूरज धनवे, कामगार मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत कुंभार, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी केशव सूर्यवंशी, किसान मोर्चा अध्यक्षपदी नीलेश ढगे, व्यापारी आघाडी संयोजकपदी अनिल ताठे, अध्यात्मिक आघाडी संयोजकपदी श्रीपाद कदम, पदवीधर प्रकोष्ठ संयोजकपदी श्रेयश खटावकर
ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजकपदी चंद्रशेखर वनारसे, पंचायत राज व ग्रामविकास संयोजकपदी अजय कामटे, बुद्धीजीवी मोर्चा संयोजकपदी अरविंद बोपर्डीकर, आयुष्मान भारत मोर्चा संयोजकपदी संतोष पाठक, ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी गणेश तारू, व्यापारी आघाडी सहसंयोजकपदी दीपक जाधव, सोशल मीडिया आघाडी संयोजकपदी केदारसिंग रजपूत, सहसंयोजकपदी चैतन्य बोरकर, प्रभाग एकच्या प्रमुखपदी विशाल गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.