पुणे – हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव पुणेकर मागील दोन दिवसांपासून घेत आहेत. मात्र, 20 डिसेंबरनंतर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. यामुळे थंडीचा जोर कमी होणार आहे. दरम्यान रविवारी (दि. 17) शहरातील किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस इतके होते. तर पाषाण आणि एनडीए परिसरात थंडीचा जोर अधिक होता.
राज्यातील काही भागात विशेषत: गोवा परिसरात ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा मध्य प्रदेश व मध्य भारतातून राज्यात येत असल्याने पुढील 24 तासात गोव्यात हलका व अति हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे राहील.
गेल्या 24 तासांतील पुणे शहरातील प्रमुख भागातील किमान तापमान
पाषाण आणि माळीण 12.5, शिवाजीनगर आणि एनडीए 13.2, तळेगाव आणि हवेली 13.6, राजगुरूनगर आणि लवासा 15.4, गिरीवन 16.3, बारामती 17.2, कोरेगावपार्क 17.9, चिंचवड, दौंड आणि इंदापूर 18.1, मगरपट्टा आणि वडगावशेरी 19.4