शिंदेनगर येथे खुंटी ठोकण्याचे कारण
फलटण – शिंदेनगर (ता. फलटण) येथे खुंटी ठोकण्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की दादासाहेब सोपान जाधव (रा. शिंदेनगर, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदेनगर येथे फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीचा चुलत भाऊ संजय विठ्ठल जाधव यास खुंटी का ठोकत आहे ? असे विचारल्याच्या कारणावरुन संजय विठ्ठल जाधव, राधिका संजय जाधव, समीक्षा संजय जाधव, विठ्ठल तुळशीराम जाधव (सर्व रा. शिंदेनगर) यांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या घरातील लोकांना दगङाने मारहाण केली.
याचा तपास हवालदार साबळे करीत आहेत. दुसरी फिर्याद संजय विठ्ठल जाधव (वय ४६) यांनी दिली असून फिर्यादीची चुलती सिंधूबाई जाधव यांच्या अंगणात खुंटी ठोकण्यासाठी मदत करीत असताना चुलत भाऊ दादासाहेब सोपान जाधव, मीनाक्षी दादासाहेब जाधव, उर्मिला बापूराव जाधव, इंदूबाई सोपान जाधव (सर्व रा. शिंदेनगर) यांनी मला व माझ्या पत्नीला दगङाने मारहाण केली. याचा तपास हवालदार चांगण करीत आहेत.