पुणे – प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य मराठी ऐतिहासिक चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुख्य भूमिका स्वतः प्रविण तरडे यांनी साकारली आहे. त्यांच्यासह या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान अभिनेत्री श्रुती मराठेचा या सिनेमातील फर्स्ट लुक समोर आला आहे. महाराणी सोयराबाईच्या महत्वाच्या भूमिकेत अभिनेत्री दिसून येणार आहे. याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या इन्स्टावरून ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले. ‘राज्याच्या दोन्ही युवराजांना प्रेमानं वाढवलेली स्वराज्य माऊली!’ असे कॅप्शन अभिनेत्रीने पोस्टला दिले आहे. महाराणी सोयराबाई यांची भूमिका या सिनेमात ती साकारणार असल्याची माहिती अभिनेत्रीने या पोस्टमधून दिली आहे.
दरम्यान, ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी मोठ्या पडद्यावर पदर्शित होणार आहे. संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहिते-पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.