मुंबई – मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अलिकडेच सारा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. सारा सर्वात लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते.
साराचा फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंट बॉलिवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. साराच्या प्रत्येक फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला दिसून येतो. त्यामुळे सचिनची ही लेक ग्लॅमरस स्टाईलने बॉलिवूडच्या आयकॉन्सना टक्कर देत आहे.
आता साराचा नवा लूक समोर आला आहे. यावेळी सारा मराठ मोळ्या अंदाजात दिसून आली. सारा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये दिसली. सारानं काठपदराची साडी नेसली होती, इतकंच नाही तर कपाळावर चंद्रकोरही होती. मराठमोळे दागिने, केसांत गजरा आणि नाकातल्या नथीने ती अतिशय सुंदर दिसत होती. सचिन तेंडुलकर आणि त्याचं कुटुंबिय जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभात सहभागी झाले होते.. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.
रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत.
साराच्या बॉलिवूड डेब्यूची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. साराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.