सारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड !

मुंबई – ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ या सिनेमात काम केल्यानंतर साराने इम्तियाज अली दिग्दर्शित लव आजकल 2 सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. तसेच गतवर्षात चित्रपटांच्या कामामुळे फार सारा व्यग्र होती.

 

View this post on Instagram

 

Lady in Lanka ??‍♀️??

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


या सगळ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सध्या ती श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या वेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सारा तिच्या सुट्ट्या पूर्ण एन्जॉय करताना दिसत आहे. श्रीलंकेला सारा तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत गेली असली तरी तिकडे ‘Me Time’ घालवायला ती विसरत नाही.

तत्पूर्वी  सारा अली खानने आपला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्यामध्ये ती किक बॉक्‍सिंग करताना दिसते होती. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “हा वीक एन्ड काही तरी वेगळे करण्याचा आहे.’ असेही तिने म्हटले आहे. तिला अचानक किक बॉक्‍सिंग का शिकायला लागले, हे एक कोडेच आहे. कारण तिच्याकडे ऍक्‍शनचा असा कोणताही सिनेमा सध्या तरी नाही. यापूर्वी रणवीर सिंह बरोबर “सिंबा’मध्ये काम केलेल्या साराचे दोन सिनेमे लवकरच रिलीज होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.