सारा अली खान करतेय मालदिवमध्ये व्हॅकेशन एंजॉय

साराने आपले खूपच सुंदर आणि हॉट असे फोटो शेअर केले

मुंबई – अभिनेत्री सारा अली खान काही दिवसांपासून मालदिव येथे आपल्या कुटुंबीयांसह व्हॅकेशनचा आनंद लुटत आहे. मालदिव येथे गेल्यानंतर साराने सतत तेथील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केले आहेत. आता सारा अली खानने आपले खूपच सुंदर आणि हॉट असे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोत सारा ही स्काय ब्ल्यू कलरच्या स्विमसूटमध्ये पोज देताना दिसत आहे. साराचा हा जबदरस्त अंदाज सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

अन्य एका फोटोत ती एका लाकडी बेंचवर बसून पोज देत आहे आणि यात तिने सन ग्लासेस घातलेले आहेत. दुस-या एका फोटोत ती समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऊपर आसमान और नीचे बालू।’

साराच्या या फोटोंवर असंख्य चाहते रिऍक्‍शन देत आहेत. तसेच यावर अनेकांनी कमेंटस्‌ केल्या आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मालदीव व्हॅकेशनमधील साराचा हॉट अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा अली खान ही अखेरच्या वेळी वरुण धवनसोबत “कुली नंबर-1’मध्ये झळकली होती. आता ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत “अतरंगी’मध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.