जस्ट मॅरीड: मिस्टर अँड मिसेस चांदेकर

सिद्धार्थ चांदेकरने बांधली मिताली मयेकर सोबत लग्नाची रेशीम गाठ

पुणे – मराठी कलाविश्वातील बहुचर्चित ठरलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. काल म्हणजेच, 24 जानेवारी रोजी सिद्धार्थने मिताली मयेकर हिच्या सोबत लग्नाची रेशीम गाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले असून, अनेकांनी या नवीन जोडप्याला आशीर्वाद दिले आहेत. 

पुण्यात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

लग्नादरम्यान सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. तर मितालीने हिरव्या रंगाची आकर्षक अशी नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लूक या दोघांनी केला होता. 

अभिनेता सिदार्थने दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. 

दरम्यान, मराठी कलाविश्वात गेल्या महिन्याभरापासून अनेक विवाह संपन्न झाले. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळाले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.