सारा अली खान सततच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान “कुली नं 1′ मुळे चर्चेत होती. आता ती पर्सनल लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी साराने तिचा आणि दक्षिणेतील सुपरस्टर विजय देवरकोंडाचा फोटो शेअर केला होता. आता या दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघितले गेले आहे.
त्यामुळेच बॉलीवूडच्या गॉसिप गॅंगमध्ये सध्या सारा अली खान आणि विजय देवरकोंडाबद्दल खुसखुशीत गप्पा ऐकायला मिळत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने एक हाऊस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला साराही पोहोचली होती. आश्चर्य म्हणजे तिच्याबरोबर विजय देवरकोंडाही होता.
या पार्टीला उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच लक्ष या जोडीकडे होते. आता सगळेच जण सारा-विजयच्या नात्यांबद्दल अंदाज बांधायला लागले आहेत. त्या दोघांबद्दल चर्चा सुरू व्हायला वेळ लागला नाही. विजय “लिगर’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. सारालाही विजयबरोबर काम करायची इच्छा आहे. विजयला बॉलीवूडमध्ये लॉंच करण्याचे काम करण जोहरने केले आहे. कदाचित त्यालाच सारा-विजयमधील नात्याबद्दल माहिती असेल.