अभिनेता आणि टिव्ही होस्ट शेखर सुमन याचा धाकटा मुलगा अध्ययन सुमनने आत्महत्या केल्याची अफवा अलिकडेच पसरली होती. ही फेक न्यूज असल्याचे थोड्याच वेळात उघड झाले होते. शेखर सुमन, त्याची पत्नी आणि इतर जवळच्या लोकांना ही बातमी पहिल्यांदा समजली तेंव्हा खरोखर धक्का बसला होता. अध्ययन सुमनने स्वतः ही अफवा असल्याचे जाहीर केले.
एका न्यूज चॅनेलने अध्ययन सुमनच्या आत्महत्येची बातमी व्हायरल केली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना अध्ययन म्हणाला, जर मी आत्महत्या केली असती. तर तुमच्या समोर काय माझे भूत उभे राहिले आहे का? ही अफवा पसरली तेंव्हा मी एका मिटींगमध्ये होतो.
मिटींगमध्ये असल्याने मी फोन “सायलेंट’ केलेला होता. मी फोन उचलत नाही, हे बघून सगळे हैराण झाले आणि मला धडाधड फोन कॉल यायला लागले. आपल्या पालकांना किती मोठा धक्का बसला असेल, याची कल्पनाच केली जाऊ शकते, असेही तो म्हणाला. आपल्याला आत्महत्या करण्याचे कोणतेही कारणही नाही, असेही अध्ययनने म्हटले आहे. अध्ययनच्या बाबतीत असे काही पहिल्यांदा घडलेले नाही. काही लोक आपल्या करिअरला समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनीच पूर्वीही अशी अफवा पसरवली होती, असे तो म्हणाला.