तुरुंगात कैद्यांच्या हातात चाकू, रॉड आणि मृत्यूचे तांडव ; टोळी युद्धात तब्बल 62 कैद्यांचा मृत्यू

इक्वाडोरच्या तीन शहरातील तुरुंगातील थरार

क्विटो : इक्वाडोर या देशातील तीन शहरांच्या तुरुंगातून पळ काढण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये दंगल उसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या टोळीयुद्धात तब्बल 62 कैद्यांचा मृत्यू झाला. तुरुंग अधिकारी एडमंडो मोनकॅयो यांनी यासंबंधी माहिती दिली.

इक्वाडोरमधील 800 पोलीस कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री उशिरा ही झटापट झाल्यानंतर शेकडो अधिकाऱ्यांना तुरुंगात तैनात करण्यात आले.

दोन्ही टोळ्या तुरुंगात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होत्या. पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर हत्यारांचा शोध सुरु करण्यात आला. त्याच वेळी तुरुंगात हिंसाचार भडकला. कैद्यांनी परस्पर गँग्जच्या सदस्यांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. दक्षिण इक्वाडोरच्या क्युकेनमध्ये 33 जणांचा मृत्यू झाला. तर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील गुआयाकिल शहरात 21 कैदी ठार झाले.

केंद्रीय शहर लाटाकुंगामध्ये आठ जणांचा हिंसाचाारात मृत्यू झाला. तुरुंग अधिकारी मोनकॅयो यांच्या माहितीनुसार देशातील तुरुंगातील 70 टक्के कैदी या केंद्रांमध्ये आहेत. त्यामुळे याच्या नेतृत्वावरुन प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये नेहमीच वर्चस्वावरुन हिंसा उफाळते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.