मुंबई – अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र गाडी न आल्याने तिने थेट रिक्षाने प्रवास केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे.
काही दिवसांपुर्वी सारा अली खान आणि विकी कौशल राजस्थानला प्रमोशन निमित्त गेले होते. त्यानंतर मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर घरी परतत असताना तिची गाडी आली नव्हती. त्यामुळे तिने वेळ वाया न घालवता, थेट रिक्षाने प्रवास केला. यावेळी ती म्हणते की, ‘माझी गाडी आली नाही म्हणून मी रिक्षाने प्रवास केला. यापुर्वी मी अनेकदा रिक्षाने प्रवास केला आहे.’
सारा अली खानचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स ऑटो ड्रायव्हरचे पैसे न दिल्याचे म्हणत आहे. यावर एक यूजर कमेंट करत म्हणतो, “रिक्षा ड्रायव्हरचे पैसे कोण देणार?… आधी ते पैसे दे” तर दुसरा युजर म्हणतो, “ड्रायव्हरला ना पैसे दिलेस ना त्याला फोटो काढून दिला.” तर काहींंनी पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे म्हणत तिला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सारा अली खानने गुलाबी रंगाचा सूट परिधान करून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिच्यासोबत कार्यक्रमाला विकी कौशल देखील हजर होता. यावेळी दोघांनीही चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरला होता. विकीसोबतच्या डान्सचा व्हिडिओ साराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘जरा हटके जरा बचके या चित्रपटात सारासोबत विकी देखील मुख्य भूमिकेत आहे. विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील झळकणार आहेत.