बिबवेवाडी, दि. 31 -राष्ट्रीय संत परमपूज्य आचार्य श्री आनंद ऋषीजी म.सा. यांच्या 123 जयंतीनिमित्त वडगाव शेरी येथील पुणे मनपा शाळा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य आणि दात तपासणी शिबिर व मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी कोठारी डायग्नोस्टिकचे प्रमुख प्रफुल कोठारी यांच्या सर्व डॉक्टरांची टीमने 550 मुलांची आरोग्य तपासणी केली.
प्रवीण चोरबेले यांनी श्री आचार्य आनंद ऋषीजी म.सा. यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. याप्रसंगी डॉ प.पू. ज्ञानप्रभाजी म.सा., यांची सुशिष्य प.पू. नियमदर्शनजी म.सा. व प.पू. अंशुश्री म.सा यांनी सुंदर असे भजन म्हटले.
याप्रसंगी माजी नगरसेविका मनीषा चोरबेले, योगेश मुळीक, शीतल शिंदे, वर्धमान युवा ग्रुप महिला बहुमंडळ, शांतीलाल बोरा, आशीष बोरा, विजय छाजेड,प्रफुल कोठारी, किशोर छोरीया, हर्षल बलदोटा, गौरव कोठारी, चेतन कोठारी, सुमित बोरा, सागर रुणवाल, स्वप्नील बोरा तसेच शाळेतील मुख्याध्यापिका ललिता बेंदे, सहशिक्षक काळे, ज्योती मुथा, छाया चोरडिया, अशोक लंगे,अनिल भन्साळी, मयूर कोठारी, शिवा केंगारे, अभिजीत डुगरवाल, संजय चोरडिया, अशोक बोरा यांनी पुढाकार घेतला.