Sanjay Raut on Vanchit । मागच्या अनेक दिवसांपासून मविआ आणि वंचितच्या युतीविषयी चर्चा सुरु होत्या. हो नाही म्हणत दोघांच्या युतीचा वाद काही केल्या सुटत नाही. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचितसोबतच्या युतीवर मोठे वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याने ही युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसतंय.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या पाठिशी जनमत आणि लोकमत आहे,” असे म्हटले. बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत तर हा विजय अधिक दैदीप्यमान झाला असता. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी खरंतर हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही, असेही त्यांनी म्हटले.
भाजपवाले भांग पिऊन बोलतात Sanjay Raut on Vanchit ।
कथित दारू घोटाळाप्रकरणात ईडीने अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता तुरूंगातून सरकार चालवणार अशी घोषणा झाल्यानंतर भाजपने ही टीका केली होती. मात्र त्यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. छगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का ? अजित पवारांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार होतात, ते गँगस्टर आहेत का ? असा खडा सवाल संजय राऊत यांनी भाजपवाल्यांना विचारला. तसेच जेलमध्ये गेलेले केजरीवाल आता आणखी मजबूत झाले आहेत, लोकं त्यांच्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, ते भांग पिऊन बोलत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर आहे का ? Sanjay Raut on Vanchit ।
छगन भुजबळ, अजित पवार, जामीनावर सुटलेले हसन मुश्रीफ, नवाब मलिक जे तुमच्यासोबत आहेत, ते गँगस्टर आहेत का, असा सवाल विचारत अनेकांचा संजय राऊत यांनी दाखला दिला. कालच तु्म्ही नवीन जिंदाल यांचा पक्षात समावेश केलात, त्यांच्यावर सीबीआयची चार्जशीट आहे, ते गँगस्टर आहेत का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, ते भांग पिऊन बोलत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.