Simon Harris Ireland Youngest PM| आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या राजीनाम्यानंतर आता येथील देशाची कमान तरुणांच्या हाती सोपवली जाणार आहे. सायमन हॅरिस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची तयारी आहे. त्यानुसार आता हॅरिस आता देशातील सर्वात तरुण पंतप्रधान बनणार आहेत.
37 वर्षीय सायमन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे, वराडकर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर सायमन हॅरिस यांना पंतप्रधान बनण्याची आणि फाइन गेल पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. हॅरिस यांना पंतप्रधानपदासाठी पक्षातील बहुतांश सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या विश्वासाची परतफेड कठोर परिश्रम करून जबाबदारीने काम करून करणार असल्याचे सांगितले. तसेच रविवारी लिओ वराडकर यांच्या जागी पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती होणे हा त्यांच्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे देखील त्यांनी म्हंटले. लिओ वराडकर हे सायमन हॅरिसच्या आधी हे पद मिळवणारे सर्वात तरुण होते. ज्यांनी 2017 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी हे पद स्वीकारले होते. त्यानंतर आता सर्वात तरुण पंतप्रधान पदी हॅरिस यांची नियुक्ती झाली आहे.
सायमन हॅरिस कोण आहे? Simon Harris Ireland Youngest PM|
सायमन हॅरिस हे लहानपणापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. पदवीनंतर त्यांनी पक्षाच्या युवा शाखेत प्रवेश केला. हॅरिसने अल्पावधीतच एक समर्पित राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी पक्षांतर्गत विविध भूमिका बजावल्या आहेत.
हॅरिसच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्यांनी 2016 ते 2020 या काळात आयर्लंडच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात, देशात कोविड-19 साथीचा रोग पसरला, ज्याच्या व्यवस्थापनात हॅरिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या ते शिक्षणमंत्रीपद सांभाळत आहेत. आपल्या कार्यकाळात आणि नेतृत्वात त्यांनी अनेक वेळा आपली क्षमता सिद्ध केली आहे.
कशी लागली पंतप्रधान पदीवर्णी ? Simon Harris Ireland Youngest PM|
भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने संपूर्ण देश हादरला असून, त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारणे सांगितली जात आहेत. वराडकर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर सायमन हॅरिस यांना पंतप्रधान बनण्याची आणि फाइन गेल पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. हॅरिस यांना पंतप्रधानपदासाठी पक्षातील बहुतांश सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. ज्यानंतर सायमन हॅरिस यांना त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. ते पंतप्रधानपद भूषवणारे सर्वात तरुण पंतप्रधान होणार आहेत. यानंतर अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
दिवंगत पतीच्या आठवणीत प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या “चंद्रपूरचा गड…”