मांजरेकरांना अखेर उपरती सुचली

मुंबई – समालोचकांच्या पथकातून पुन्हा एकदा डच्चू मिळाल्यानंतर माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांना उशिरा शहाणपण सुचले. ज्या रवींद्र जडेजा याला सातत्याने पाण्यात पाहत असलेल्या मांजरेकर यांनी अचानक त्याचे कौतुक केले आहे.

एल-क्‍लासिक असे संबोधले गेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यातील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यापूर्वी मांजरेकर यांनी जडेजा याच्याकडे सामना जिंकून देण्याची तसेच गरज पडल्यास अत्यंत आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने त्याचा योग्य वापर करुन घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले होते.

त्यावर अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. आयपीएल 2021मध्ये रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार धोनीच्या आधी फलंदाजी केली पाहिजे. चेन्नई संघासाठी ही एक चांगली रणनीती ठरेल. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर संघाला झटपट धावा बनवून देऊ शकतात. धोनीच्या आधी फलंदाजीला येत शार्दुल पिंच हिटरची भूमिका बजावू शकतो, असे सांगताना मांजरेकर यांनी जडेजाबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे.

मात्र, हे मत मांजरेकर यांनी समालोचक पथकातून डच्चू मिळाल्यानंतर व्यक्त केले असल्याने हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.