Sanjay Mandalika | Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान आता दोघांकडून देखील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून वैयक्तिक पातळीवर टीका होऊ लागली आहे. अश्यातच, आता शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. । Sanjay Mandalika | Shahu Maharaj
आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं आहे. ते काल चंदगड तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते.
संजय मंडलिक नेमकं काय म्हणाले ? । Sanjay Mandalika | Shahu Maharaj
संजय मंडलिक यांची कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
“या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार,” असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले.
आखाड्यात टीकेला प्रत्युत्तर मिळणारच… । Sanjay Mandalika | Shahu Maharaj
शाहू महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचे काम केले ते म्हणजे प्रत्येक घरात पुरोगामी विचार दिला. आता निवडणुकीला उभा राहिलेल्या वारसदाराने देखील सांगितले पाहिजे त्यांनी काय काम केले. थेट पाईपलाईनचे पाणी आणले म्हणतात संपूर्ण कोल्हापूरकर म्हणत आहेत एकट्यानेच अभ्यंग स्नान केले का?
आम्हाला देखील कुणावर टीका करण्यात रस नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्ही देखील कोल्हापूरकर आहोत. हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही संजय मंडलिक काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. । Sanjay Mandalika | Shahu Maharaj