मुंबई – संजय कपूर यांची लेक शनाया कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देत असते. अनेक जण तिच्या बॉलिवूडमधील डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच ती पॅन इंडिया चित्रपट वृषभामधून चित्रपटात पदार्पण करणार आहे.
याबाबत शनाया कपूर म्हणाली, “कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की या चित्रपटाद्वारे मी काहीतरी शिकू शकेन आणि मला खूप काही जाणून घेण्याची संधी मिळेल.” शनायासह या चित्रपटात सलमा आगा यांची मुलगी जाहरा एस. खान देखील डेब्यू करणार आहे. जाहरा या चित्रपटात योद्धा म्हणून अनेक अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात शनया अभिनेता मोहनलालसोबत काम करणार आहे.
या चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. हा चित्रपट प्रेम आणि बदला यावर लक्ष केंद्रित करतो. हा चित्रपट तेलुगु आणि मल्याळममध्ये चित्रित केला जाणार आहे. ‘वृषभ’ चित्रपटाचे दिग्दर्शन नंद किशोर करत आहेत. कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव नंद किशोर म्हणतात, “शनाया आणि झारा या दोघीही ‘वृषभ’ चित्रपटातील आपापल्या पात्रांसाठी योग्य पर्याय आहेत. त्यांची कौशल्ये आणि त्यांची दृश्य प्रतिमा त्यांना त्यांची पात्रे साकारण्यास मदत करतात. दोघीही खूप कर्तृत्ववान तसेच खूप मेहनती आहेत. एक दिग्दर्शक म्हणून या दोघांमधील उत्तमोत्तम गोष्टी प्रेक्षकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल.”