Sanjay Dutt – आजकाल राजकुमार हिरानी त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला शाहरुख खान स्टारर ‘डिंकी’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा इमोशनल चित्रपट सर्वांची मने जिंकत आहे. अशात, हिराणी यांनी संजय दत्त अभिनीत त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुन्ना भाई’ फ्रेंचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या इंस्टॉलमेंटबाबत रोमांचक अपडेट शेअर केले आहे. अलीकडेच वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारानी हिरानी यांनी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’चा तिसरा भाग येण्याची शक्यता वर्तवली होती.
राजकुमार हिरानी म्हणाले,’मुन्ना भाईसोबत आमचा संघर्ष असा आहे की, शेवटचे दोन चित्रपट इतके चांगले बनले आहेत की माझ्याकडे अजूनही 5 अर्ध-लिखित स्क्रिप्ट पडून आहेत. मी अनेकदा संजू (संजय दत्त) शी बोलतो. तो म्हणतो एक बनवावे. हा ‘डिंकी’ आता संपला आहे, त्यामुळे आता मी जुन्या कथांचा डबा उघडणार आहे. मला अजून एक मुन्नाभाई बनवावासा वाटतो, पण कधी ते मला माहीत नाही.”
2003 मध्ये, राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदा मुन्ना भाई (संजय दत्त) आणि सर्किट (अर्शद वारसी) या कॉमेडी चित्रपट मुन्ना भाई एमबीबीएस द्वारे जगाला ओळख करून दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि सुपर-डुपर हिट ठरला. त्यानंतर 2006 मध्ये हिरानींनी ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज केला. या चित्रपटात पुन्हा एकदा संजय दत्त आणि अर्शद वारसारी यांनी गांधीगिरीच्या स्पर्शाने लोकांच्या मनाला भिडले. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.