Sridhar Vembu : अनेकांचे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असते मात्र असे काही लोक असतात. जे मोठी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात. असेच एक उद्योगपती श्रीधर वेंबू यांनी अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आणि त्यांनी येथील एका छोट्या गावात आपली कंपनी सुरू केली.
श्रीधर वेंबू हे झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. DNA अहवालानुसार, या कंपनीचा महसूल $1 अब्ज म्हणजेच 39,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अब्जाधीश उद्योगपती असूनही तो अनेकदा सायकल चालवताना दिसतात. पद्मश्री पुरस्कार विजेते श्रीधर वेंबू हे भारतीय अब्जाधीश आहेत.
श्रीधर वेंबू यांच्या करियरची सुरुवात कशी झाली?
श्रीधर वेंबू हे झोहोचे संस्थापक असून त्यांनी एक सामान्य कर्मचारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि कोणत्याही निधीशिवाय 39,000 कोटी रुपयांची फर्म तयार केली. तामिळनाडूचे रहिवासी असलेले श्रीधर वेंबू मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. विशेष बाब म्हणजे श्रीधर वेंबू यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेतून पूर्ण केले. 1989 मध्ये आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर वेंबू पीएचडीसाठी अमेरिकेला रवाना झाले.
अमेरिकेत राहून पीएचडी पूर्ण करून नोकरी करून वेंबू भारतात परतले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, श्रीधर वेंबू यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता, त्यामुळे त्यांनी लोकांचे ऐकण्याऐवजी मनाचे ऐकले. 1996 मध्ये श्रीधर वेंबू यांनी त्यांच्या भावासोबत अॅडव्हेंटनेट ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सुरू केली. 2009 मध्ये या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन करण्यात आले. ही कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा प्रदान करते.
ग्रामीण भागात व्यवसाय वाढवण्याचा हेतू
विशेष म्हणजे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही महानगर निवडले नाही, तर त्यांनी तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात आपली कंपनी स्थापन केली. वास्तविक, त्यामागे त्यांचा हेतू हा होता की त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय ग्रामीण भागात वाढवायचा होता. श्रीधर वेंबू यांची इच्छा आहे की ग्रामीण भागातील प्रतिभावान लोकांनी भारताच्या मुख्य निर्यात आयटी सेवांमध्ये काम करावे.
जोहोच्या कार्यालयाच्या बांधकामामुळे तेनकासीला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. श्रीधर यांनी जवळच्या मथलमपराई गावात एक जुना कारखाना खरेदी करून त्याचे कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर केले. आज कंपनीचे सुमारे 500 कर्मचारी तेनकासीमध्ये काम करतात. झोहोचा महसूल 2022 मध्ये 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 8300 कोटी रुपयांच्या वर गेला होता.