मुंबई- बिग बॉस विजेता एमसी स्टॅन खूप स्टायलिश आहे. शोमध्येही सर्वजण त्याला शूज आणि टी-शर्टची किंमत विचारून चिडवताना आपण पाहिलं आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाकडून त्याला एक आगळवेगळ गिफ्ट मिळालं आहे. यामुळे स्टॅन भलताच खुश झाला आहे. त्याने सोशल मीडियावरून सानियाचे आभार देखील मानले आहेत.
एम सी स्टॅनला सानियाने दिलेलं गिफ्ट प्रचंड आवडलं आहे. यामुळेच त्याने याबाबतची माहिती सर्वांना दिली आहे. विशेष म्हणजे त्याच्या फॅन्सला देखील यामुळे आनंद झाला आहे. कारण या गिफ्ट विषयीचाच स्टॅनचा एक डायलॉग खूप फेमस आहे. हा डायलॉग प्रत्येक स्टॅन फॅन मारत असतो. स्टॅन आणि सानिया आयांची गेल्याच महिन्यात भेट झाली होती.
गेल्या महिन्याच्या 5 तारखेला, भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झा हैदराबादच्या लाल बहादूर टेनिस स्टेडियममध्ये आपल्या टेनिस मॅचसाठी आली होती. तर याच वेळेस रॅपर एमसी स्टेनला देखील कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्टॅनने तिथे येऊन परफॉर्म केले आणि सानियाची भेटही घेतली.
स्टॅनवर खूश होऊन सानियाने त्याला 91,000 रुपये किमतीचे काळे नायके शूज आणि 30,000 रुपये किमतीचे गॉगल्स भेट दिले. स्टॅन या भेट वस्तूंमुळे भलताच खुश झालाय. यासाठी त्याने सानियाचे आभारही मानले. सानिया मिर्झाकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिला ‘आपा’ संबोधून तिचे आभार मानले. यासह त्याने आपला फेमस डायलॉग ”तेरा घर जायेगा इसमे’ देखील यावेळी पोस्ट केला आहे.
एमसी स्टॅनबद्दल सांगायचे तर, त्याने बिग बॉस 16 जिंकल्यापासून तो देशभरात लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. अलीकडेच इंदूरमध्ये त्याच्या शोदरम्यान बराच राडा झाला होता. मात्र एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटीप्रमाणे त्याची दिवसेंदिवस फॅन फॉलोविंग वाढत चालली आहे.