मुंबई – बॉलीवूड अभिनेता ‘संदीप नाहर’ यानं त्याच्या मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीप नाहर यानं याआधी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत “धोनी: द अनटोल्ड स्टोरी” या चित्रपटात काम केलं होत. याशिवाय संदीपनं ‘केसरी’ , ‘कहने को हमसफर हैं’ या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.
संदीपनं आपल्या मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. जी पाहता ही त्यांची सुसाईड नोट आहे, असंही मत अनेकांनी मांडलं.
दरम्यान संदीपनं आपल्या पोस्ट मध्ये कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं संदीपनं म्हटलं आहे.
‘संदीप नाहर’च्या अश्या अचानक जाण्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीत देखील चर्चेला उधाण आलं आहे. संदीपने खरच आत्महत्या केली आहे का? याचा तपास आता पोलीस अधिकारी करत आहेत.